Best 300+Marathi Ukhane for female | Expresses blessings and various emotions through poetry

Marathi Ukhane for female | Ukhane Marathi for female

Ukhane Marathi for female/Marathi Ukhane for female-मराठी उखाणे मुलीसाठी ही मराठी सांस्कृतिक पदांची एक विशेष भाग आहे ज्या विशिष्टपणे महिलांसाठी मिळतात. ते विशेष काळजीपूर्वक विवाहांमधून सांगितले जातात. या उखाणांना सुंदर आणि मनोरंजनाचे अभिव्यक्ती असतात, कधीकधी थोडेसे मिळकत असलेले असते. ते बRIDE च्या सुंदरतेचे, तिच्या जीवनातील नवीन प्रवासावर किंवा घटनेच्या आनंदावर केंद्रित होतात. ते मराठी सांस्कृतिक एक महत्वाचा भाग आहे आणि समुदायात संपन्न आणि सांभाळले जातात.

Ukhane Marathi for females are traditional pieces of poetry specifically meant for women. They are often recited during special events like weddings. These Ukhane in Marathi for females usually have beautiful and heartwarming expressions, sometimes with a touch of sweetness. They are an important aspect of Marathi traditions and are cherished and shared among the community.

Here is the best Ukhane in Marathi for female list for you to add fun to your life.

1    latest ukhane in Marathi for female

Ukhane Marathi for female

जीवनाच सोन करेन मी, सगळ सुख मी तुला देईन,
___________ रावांचे नाव आजपासून मी, सगळीकडे घेईन.

 लग्नाच्या आधी, बांधला नवीन बंगला,
_______ रावांच्या प्रपंचात, जीव माझा रंगला.

आई वडील, पहिले माझे गुरु,
________ रावांचे नाव घेऊन, उखाणा करते सुरु.

 पैठणीवर शोभे, सुंदर मोरांची जोडी,
_______ रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.

 होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात, घेतात सर्व उखाणे,
_______ रावांमुळे माझे, आयुष्य चालले आहे सुखाने.

खूप संकट आले, पावलो पावली,
________ रावांच्या घरात, अखेर भेटली मला सावली.

खुश ठेवा मला, नको माणिकमोती,
__________ राव नेहमी ऱ्हावा, तुम्ही माझ्यासोबती.

1.1    New Marathi ukhane for female

 दहातून दहा गेले, बाकी राहिले शून्य,
______ रावांसारखे पती मिळाले, हेच माझे पुण्य.

शेतामध्ये पावसात, नाचत होता मोर,
_______ रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर.

संध्याकाळची बत्ती लावायचा, टाईम असतो सात,
_______ रावांना देईल मी, जन्मो जन्माची साथ.

 सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत, दाराच्या अंगणात,
______ रावांसोबत संसार फुलवेल, आनंदाच्या वृंदावनात.

दोन जीवांचे, जातक जुळले,
_________ रावांमुळे सुख काय आहे, ते कळले.

अरेंज म्यॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल, याची होती भिती,
परंतु ________ रावांच्या येण्याने, बदलली माझी स्तिथी.

1.2    new ukhane in Marathi for female

आई-वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे,
____________ रावांमुळे आज, दिवस पाहते सुखाचे.

घालते मी शुभप्रभाती, पाणी तुळशीला,
_________ रावांनी मला, बायको करून आणली मुळशीला.

हा लाख मोलाचा ऐवज सारा, मी तुमच्या हवाली करते,
__________ राव मला नको अजून काहि, मी फक्त तुमच्यावर मरते.

लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व,
__________ रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व???

जन्मात एक झाली, हि प्रितभेट देवा,
_________ राव मला साथ जन्मी, तुमचीच पत्नी ठेवा.

1.3    Latest Marathi ukhane for female

Marathi Ukhane for female

स्वप्नात पहिले जे, ते रूप हेच होते,
_______________ रावांचे नाव आज, सर्वांसमोर घेते.


उंच मनोरे, नव्या जगाचे,
______________ रावांमुळे भेटले मला, हे दिवस सुखाचे.


दासांचाही दास श्रीहरी, नंदाचा नंदन,
__________ रावांचे नाव घेऊन करते, तुम्हा सर्वांना वंदन.

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात ______ आणि _______ ची जोडी आहे जबरदस्त.

देवाच्या देवळात, गोड सनई वाजते,
तुमच्या आशीर्वादाने, ________ रावांचे नाव, महाराष्ट्रात गाजते.

पहिल्या पावसात, मातीचा छान आला सुगंध,
_________ राव माझ्या आयुष्यात आल्याने, भेटला मला आनंद.

दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी,
_______ राव आले आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.

2    funny ukhane in Marathi for female

स्त्री शिवाय घराला, नाही कशाचा अर्थ,
_____________ रावांचे कष्ट मी, जाऊ देणार नाही व्यर्थ.

रंग हे नवे, गंध हे नवे,
____________ रावांची साथ, मला ७ जन्मी हवे.

शब्दही न बोलता, साद घातली कुणी,
______________ राव आहेत, माझ्या दिलाचे धनी.

समोर येताच तुमचा चेहरा, बघून काळजाचा चुकतो ठोका,
___________ रावांचे सर्वांसमोर नाव घेण्याचा, भेटला आज मोका.

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात ______ आणि _______ ची जोडी आहे जबरदस्त.

बेसुरी मी, तू सूर माझा,
___________ तू आहेस, माझ्या दिलाचा राजा.

७ ला म्हणतात, इंग्रजीमध्ये सेवन,
_____ रावांसाठी शिकेन, मी सर्व जेवण.

आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया,
________ रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया.

2.1    Ukhane Marathi for Female funny

सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ,
______ रावांच्या मांडीवर ______ घेते झोप.

आंबे वनात, कोकिळा गाते गोड,
________ रावांचे नाव घेते, वैनी वाट माझी सोड.

गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
_________ रावांचे नाव घेते ______ ची सून.


 लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ,
अखेर ________ रावांशी बांधली, लग्नाची गाठ.


सासरे आहेत प्रेमळ, सासूबाई आहेत दयाळू,
_______ रावांचे नाव घेते, आहेत खूप मायाळू.

2.2    funny ukhane for female

गुलाबाचे फुल, गणपती बाप्पाला वाहिले,
_____________ च्या साठी, गाव पाहिले.

संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
______ रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.

संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,
______ रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.

नको मोहन माळ, नको हिऱ्याचा हार,
_______ रावांच्या जीवनात, मी सुखी आहे फार.

मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती,
________ रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.

3    Marathi ukhane for female romantic

Marathi ukhane for female romantic

सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा,
रावामुळेच लागला मला त्याचा लळा.

मंद आहे वारा संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो …. आणि माझी जोडी.

शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड,
…. चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.

नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन,
रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन.

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

3.1    romantic ukhane in Marathi for female

धरला यांनी हात वाटली मला भीती,
हळूच म्हणाले …. राव अशीच असते प्रीती.

एका वर्षात असतात महिने बारा,
…. च्या नावात समावलाय आनंद सारा

गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,
रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले.

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
रावांचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून

चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती,
रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
रावांचे नाव घेते तुमच्या साठी

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.

4    long ukhane in Marathi for female

आग्रह केला तुम्ही म्हणून घेते खास नाव,
सासू आहे माझी दुसरी माऊली,
वाटते मला सुखाची सावली,
सासर्‍यांचा आहे खूपच रुबाब,
देत नाही त्यांना कोणी उलटा जवाब,
जे असतात नेहमी हसरे,
… राव माझे सासरे,
येऊ देत नाही माझ्या डोळ्यात आसु,
….. माझी सासु,
मैत्रिणीसारखी आहे माझी ननंद,
नाव त्यांचे घेताना होतो मला खूप आनंद,
बहिणीसारखी आहे माझी जाऊ,
… ताई आपण दोघी खूप सुखाने राहू,
मागणं मागते पाहून श्रीकृष्णाची मूर्ती,
वाढत राहो माझ्या सासरची सुख-समृद्धी आणि कीर्ती,
.. रावांचा आणि माझा लाखात एक जोडा, 
.. रावांचा आणि माझा लाखात एक जोडा,
आता तरी तुम्ही आमची वाट सोडा.

कणकण कुदळी, मन-मन माती, 
पोचारल्या भीती, चेतरले काम,
सासूबाईच्या पोटी जन्मले राम,
राम गेले हटा,
हटावून आणल्या करडी,
त्याच्या घेतल्या आरडी,
उरल्या सुरल्या शिक्यावर ठेवल्या,
शिक तुटलं, भांडं फुटलं,
वगळ गेला परस दारी,
परसदार म्हणतं नाव घे पोरी,
नाव काय फुकटचं,
नाव हळदी कुंकवाचं,
हळदी कुंकवाने भरले ताट,
…राव बसले जेवायला
तर समया लावते तीनशे साठ.

4.1    Long Marathi ukhane for female funny

येत होते जात होते,
खिडकीवाटे पाहत होते,
खिडकी लागली कानाला,
खिडकीला तीन तारा,
अडकीले घुंघर बारा,
पान खाते कराकरा,
घाम येतो दरदरा,
तिकडून आला व्यापारी,
व्यापारीनं दिली सुपारी,
सुपारी देते वाण्याला,
हंडा घेते पाण्याला,
पाणी आणते गंगेचे,
वाडा बांधते भिंगाचं,
वाड्यात वाडे सात वाडे,
एका वाड्यात पलंग,
पलंगावर गादी,
गादीवर उशी,
उशीवर होती कप-बशी,
कपबशी दिली पाहुण्याला,
त्यांनी पाहिलं समोरच्या भिंतीला,
भींतीवर होती घड्याळ,
घड्याळात वाजले एक,
… रावांचे नाव घेते,
… ची लेकं.

सासरचा गाव चांगला,
गावामध्ये बंगला
बंगल्याला खिडकी
खिडकीत द्रोण
द्रोणात तुप
तुपा सारखे रूप
रूपा सारखा जोडा
चंद्रभागेला पडला वेढा
चंद्रभागेची पाच नाव
नावेत बसावं
आणि
… रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर, फिरवावं.

आडगाव माझ सासर ,
जयपुर माझ माहेर ,
गावात घर, घरासमोर अंगण,
अंगणात मोठे प्रांगण,
प्रांगणात तुळशीचे वृंदावन,
वृंदावना समोर रांगोळी,
नाव घेते हळदीच्या वेळी,
नाव घ्या, नाव घ्या,
नावात काय असत,
नावात असत,
लहानांच मोठेपण,
मोठ्यांचा थोरपण,
थोरांचा मान,
तोच आमचा स्वाभिमान,
… रावांच नाव घेऊन ठेवते सर्वांचा मान.

5    short ukhane in Marathi for female

रखरखत्या वैशाखात, प्रेमाचा धुंद वारा,
जीवनाचा खेळ समजला, ________ मुळे सारा.

 लक्ष्मी माते वंदन करते, मनी श्रद्धेचे बळ,
________ रावांच्या संसारी दे, समृद्धीचे फळ.

चालली सप्तपदीचे, सात पावले,
_______ रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.

श्लोक रामदासांचे, आहेत किती छान,
______ रावांच्या संसारात, हरवले मी भान.

 कपाळावरील कुंकू, मांगल्याची खूण,
______ रावांची आणि माझे, जुळले, ३६ गुण.

दूर डोंगरापल्याड, नदीकाठी माझे गाव,
___________ रावांना आवडले फार, म्ह्णून माझ्या नावापुढे त्यांचे लागले नाव.

जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट,
परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून, नातेवाईकांना वाटत होते मी केला मोठा गुन्हा,
पण ________________ राव हवेत मला जोडीदार म्हणून, ७ जन्मी पुन्हा.

युक्ती आणि शक्तीची, पुण्याई येथे मोठी,
_______________ रावांचे नाव घेते, छत्रपती शिवरायांचे नाव नेहमी आमच्या ओठी.

जुळल्या रेषा नशिबाच्या, येता हाती हात,
_____ आणि _______ची जोडी बघताच, सर्व म्हणतात क्या बात, क्या बात.

6    Ukhane in Marathi for female marriage

 Ukhane in Marathi for female marriage

घातली मी वरमाला हसले …. राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
…. बरोबर संसार करीन सुखाचा.

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
…. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.

हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
…. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,
………. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.

6.1    Marathi ukhane for female wedding

कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट…. नाव घेते बांधते……… च्या लग्नाची गाठ.

नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
….. च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते

चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
—– रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.

लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.

सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात
..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात
..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात
.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!

हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
…. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!

शेल्या शेल्याची बांधली गाठ,
…….नाव मला तोंडपाठ.

7    Simple&Easy Marathi ukhane for female

 फुलांचा राजा आहे गुलाब,
__________ला होतात, नेहमी जुलाब.

वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
…. च्या सवे चालते मी सप्तपदी… !!

 कामाला जाताना, लावते नेहमी लायनर,
________माझी बायको आहे, खूप शायनर.

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
…. चं नाव घेते देवापुढे.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.

7.1    simple ukhane in Marathi for female

 प्रेमात झालो हिच्या मी, वेडा पिसा,
_____________ ने केला नंतर माझा, खाली खिसा.

रुप्याचा लोटा, सोन्याची झारी,
असली काळीसावळी, तरी _______ माझी प्यारी.

तुझी आई माझी सासू, आणि माझी आई तुझी सासूबाई,
_________ मला लग्नानंतर, करून टाक घरजावई.

 लग्नात उभे राहून, कंबर खूप मोडली.
_____ साठी मी आजपासून, दारू सोडली.

 मेकअप केला कि दिसतात लोक, हिरो- हिरोईन सारखे,
पण _____ चे नाक आहे, डुकरासारखे.

झोप नीट लागावी म्हणून, मानेखाली घेतली उशी,
________माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.

7.2    Easy Marathi ukhane for female

 लहानपणी खेळायचो खेळ, तळ्यात मळ्यात,
______ पडली अखेर, माझ्या गळ्यात.

स्कुटी नीट येत नाही, तरी चालवते पाय घसरत,
_______ खूप करते, स्कुटी चालवताना कसरत.

टीव्ही सिरीयल बघून, बायका झाल्या आहेत पागल,
_____ तू नको बघूस, नाहीतर तुलापण वेड लागल.

नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
…….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.

 खायला आवडतो सर्वाना, बासमती तांदूळ,
______ झोपते अशी, जसा रेंगतो गांडूळ.

काम नाही येत, होते नेहमी गडबड,
_________ करते नुसती, फुकटची बडबड.

ट्रेन ची तिकीट काढण्यासाठी, खूप होती लाईन,
_____ ला भेटण्यासाठी गेलो दादरला, आणि तिकीट नव्हती काढली म्हणून पडली फाईन.

8    Unique Marathi Ukhane for female

Unique Marathi Ukhane for female

आयुष्यात सु:ख-दुःख, दोन्ही असावे,
______ रावांचे प्रेम, माझ्यावर सदैव असावे.

वडिलांची छाया, आईची माया,
_________ रावांच्या सुखासाठी, झिजवते काया.

 रात्रीच्या आकाशात, चमचमते तारे,
_______ रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे.

 सोन्याच्या बेसरीत, पाचूचा खडा,
______ राव अन माझा, ७ जन्माचा जोडा.

 आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार,
______ रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार.

8.1    Unique Ukhane in Marathi for female

चहा केला नेऊन दिला, दुधाने भरले कप,
__________ रावांसाठी केले, ५ वर्ष तप.

आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी,
________ च नाव घेतो, राम कृष्ण हरी.

कस्तुरीचा जन्म, सुगंधाकरिता,
माझे जीवन अर्पण, ______ रावांकरिता.

प्रेम काय आहे, हे माहित नव्हते मला,
ते खूप सुंदर आहे, हे _______ रावांमुळे कळले मला.

चांदीच्या नक्षीदार ताटाला, सोन्याचा गिलावा,
________ रावांसारखा गुणी पती, जन्मोजन्मी मिळावा.

9    Marathi Ukhane for female Satyanarayan pooja

 गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र,
_____ रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.

9.1    satyanarayan pooja ukhane for female

पूजेपुढे ठेवल्या फळांच्या राशी 
…… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी 

सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट 
……यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट

मंथरेमुळे घडले रामायण,
….. चे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण

 

जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण
…..नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण.

….. सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन.
…..माझा हीरो मी त्याची हिरॉईन

हिमालय पर्वतावर आहे, शंकर पार्वतीचा सहवास,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.

 शंकर पार्वतीचे, हिमालय आहे उगमस्थान,
____ रावांचे नाव घेऊन, ठेवते सर्वांचा मान.

9.2    satyanarayan ukhane for female

 लग्नकार्य हा आयुष्यातील एक, महत्वाचा भाग आहे,
________ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सदैव असाच राहे.

ठाण्यातल्या गडकरीला लागलंय मोरूची मावशी 
……चे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी 

चांदीच्या तबकात तुपाच्या फुलवाती 
….रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 

आजच्या पूजेला फुलांच्या राशी, 
…..च नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 

भिल्लीणीच्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा 
…..च्या सोबत आज पहिली सत्यनारायणाची पूजा

दारावर लावले झेंडूचे तोरण 
…..चे नाव घेते सत्यनारायणाचे कारण 

9.3    Satyanarayan pooja ukhane in marathi for female

जेव्हा भगवान भोलेनाथ चा, बुलावा येईल,
तेव्हा __________ ला सोबत, केदारनाथ ला घेऊन जाईल.

चांदीच्या ताटात ठेवले लाडू
…..चे नाव घेते सत्यनारायणापुढे 

घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी 
……चं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 

आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,
…. चं नाव घेते बारशाच्या दिवशी.

चांदीच्या ताटात, कंदीचे पेढे,
__________ च नाव घेते देवापुढे.

10    easy ukhane in Marathi for female

 रायगडावर केले मी, शिवरायांचे दर्शन…
________ रावांच्या प्रेमासाठी, संपूर्ण जीवन अर्पण.

 मंगळसुत्रात असतात ,काळे मणी,
_________ राव आहेत, माझे धनी.

फुलांचा सुगंध, दरवळला चहूकडे,
_______ रावांचे नाव, मोठं होउदे सगळीकडे.

चुलीवरच्या जेवणाचा, आनंद असतो वेगळा,
_______ रावांच्या जीवनात येऊन, आनंद भेटला सगळा.

 संत्री ला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज,
__________ आणि माझे झाले लव्ह मॅरेज.

 निवडणूक लढायला, आहेत खूप पक्ष,
________ रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्ष.

 कोकणात आहेत, जंगल घनदाट,
_______ रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.

 आहे मी एकुलती एक, नाही कधी वाईट केले कसले सेवन,
______ तुमच्यासाठी शिकेन मी, बनवायला जेवण.

विवाहाच्या मंडपात, सुंदर फुलांचा थाट,
______ रावांचे नाव घेऊन बांधते, वधू वराची गाठ.

आवडता ऋतू आहे, आमचा पाऊस,
______ रावांना माझे नाव घेण्याची, खूप हाऊस.

11    Gruhpravesh ukhane for female/Gruhpravesh Ukhane for New Home

दत्तगुरूंच्या रूपात दिसतात मला ब्रम्हा, विष्णू  आणि महेश,
…. रावांचे नाव घेत करते गृहप्रवेश

… ची लेक मी झाली आता… ची सून,
…. रावांचे नाव घेत करते गृहप्रवेश

 मंगळसूत्राच्या वाट्या म्हणजे सासर आणि माहेर,
…. रावच आहेच माझा गृहप्रवेशाचा आहेर

लग्न झाले आता बहरू दे आमच्या संसाराची वेल,
… रावांचे नाव घेते वाजवून नव्या घराची बेल

शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून,
…. रावांचे नाव घेते नव्या घरी सर्वांचा मान राखून

चांदीच्या ताटात भरवला पुरणपोळीचा घास,
…. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी खास

 श्रीमहालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी,
…. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी

 नव्या कामाची सुरूवात जशी श्रीगणेशापासून,
…. रावाचे नाव घेते नव्या घरात बसून

आर्शीवादाचे दान घेते तुम्हा सर्वांसमोर वाकून,
… रावांचे नाव घेते नव्या घरात तुमच्या सर्वांचा मान राखून

12   मुलींसाठी उखाणे-Marathi Ukhane for Girls

मुलींसाठी उखाणे-Marathi Ukhane for Girls

प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले,
_________ रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले.

हळद लावण्यासाठी, बसली मी पाटावर,
_____ रावांच नाव काढलंय, मेहंदीने हातावर.

आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे,
______ रावांसाठी, सोडून आले मी सारे.

परिवार खुश राहील, जोडून नाती घट्ट,
______ पुरवतील आता, माझा सर्व हट्ट.

एकविरा आईच्या मंदिरात, नवसाच्या रांगा,
_______ रावांचे नाव घ्यायला, मला केव्हाही सांगा.

आई-वडिलांना काळजी होती, कसे मिळेल घर,
__________ रावांचे नाव घेते, मिळाले शांत वर.

 स्वप्नातला गुलाब, गालात हसला,
________ रावांचे नाव घेण्यास, मान कसला.

गेल्या त्या आठवणी , आणि गेले ते दिवस,
______ आज आहे आपल्या आयुष्याचा, सुखाचा दिवस.

शेगावचे गजानन, शिर्डीचे साई,
_______ रावांचे नाव घेते, सागर ची आई.

मुंबईला म्हणतात, स्वप्नांची नगरी,
मी खुश आहे कारण मी पडली, ________ रावांच्या पदरी.

देवाला भक्त करतो, मनोभारे वंदन,
_________ मुळे झाले, संसाराचे नंदन.

पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले,
________ च नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले.

ताटभर दागिन्यांपेक्षा, माणसं असावी घरभर,
_________ रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा जन्मभर.

 पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात,
_____ रावांचे नाव घेते ______च्या अंगणात.

13  Marathi Ukhane For Bride

 तलावात उगवतात सुंदर कमळ,
_____ रावांच नाव घेते, आहेत खूप प्रेमळ.

 चला सगळे घरी, संपली आमची वरात,
________ रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते घरात.

कृष्णा ने ठेवले गोकुळ खुश, वाजवून बासुरी,
_______ रावांच नाव घेऊन, आजपासून संसार सुरु सासरी.

 कोकणचे समुद्र आहेत, निळे निळे गार,
__________ आहेत माझे, फेव्हरेट स्टार.

 लग्न आटपले, आणि काढली वरात,
________ सगळ्यांसमोर उचलून, न्या मला घरात.

अमरीतसर वरून आणला, हातात घालायला कडा,
________ रावांच्या नावाने भरते, लग्नचुडा.

 आकाशातून पडतो, तुटता तारा,
________ मध्ये आहे, माझा जीव सारा.

इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात,
_______ रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते आत.

 अलिबागला जाताना , मज्जा येते होडीने.
__________ घरात प्रवेश करू जोडीने.

आई-वडिलांना इंग्लिश मध्ये बोलतात, पप्पा आणि मम्मी,
___________ तुमची साथ हवी, सात जन्मी.

Read More Related Marathi Ukhane for female

Read More Related Best Wishes in Marathi

ताज्या पोस्ट