Romantic Love Shayari Marathi | रोमँटिक लव्ह शायरी मराठी

Love Shayari Marathi, Romantic Love Shayari in Marathi

Romantic Love Shayari Marathi-"रोमантиक लव शयारी मराठी" म्हणतात मराठी ची रोमан्टिक लव शयारी. ती चांगली शब्द आणि भावनांसाठी प्रेरणा करतात आपल्या प्रीत्यांना मोह ची, आनंदी ची, इच्छा आणि प्रेम पाठवितात. आमच्या प्रथाने 1 लाइन शयारी मराठी, 2 लाइन शयारी मराठी, 3 लाइन शयारी मराठी, 4 लाइन शयारी मराठी असते आणि तीनेकी लाइन शयारी मराठी सर्वात आपल्या प्रथाने पाहिजे.

Romantic Love Shayari Marathi-

Romantic Love Shayari Marathi Image

"Romantic Love Shayari Marathi" refers to the romantic love poems in Marathi. These use beautiful words and emotions to convey deep affection, longing, desire, and love for the lover. The usual forms include 1 line Shayari Marathi, 2 line Shayari Marathi, 3 line Shayari Marathi, and 4 line Shayari Marathi, among which 2 line Shayari Marathi is the most common. Here are some brilliant love Shayari Marathi texts which can raise your love.

Love Shayari Marathi

Love Shayari Marathi

Love Shayari Marathi Image

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर,
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील तरी मला
तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

 माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,
फक्त हा देह माझा,
त्यातील जीव आहेस तू

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

 प्रेम म्हणजे कधी उन्हात
पडणारं अप्रतिम चांदणं
प्रेम म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी
उगाचच भांडणं

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…

 मला ती पाहिजे
जिला मी पाहिजे

गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी.
चंद्राइतकी सुंदर नकोच…
फक्त परी लाजरी मिळावी.

 तुझी वाट पाहताना माझे दिवस संपतात
पण माझं वाटं पाहणं काही संपत नाही

हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…

 तुझं हसणं आणि माझं फसणं
दोन्ही एकाचवेळी घडतं,
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडतं

तुझ्या रुपाने सापडला मला उत्तम जोडीदार,
देवाकडे मानते मी आभार

“तुझ्यात “मी”?
माझ्यात “तू”?
प्रेम ? आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून”? भांडत जाऊ.

प्रेम असे असावे केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे असावे…

खरं प्रेम ते असतं
ज्याच्यामध्ये वयाचा आणि कास्टचा
विचार केला जात नाही

गोड आठवणी आहेत  तेथे
हळुवार भावना आहे,
हळुवार भावना आहेत तेथे
अतुट प्रेम आहे, जिथे अतूट प्रेम आहे
तेथे नक्कीच तू आहेस

 माझ्या आयुष्याची पतंग तेव्हाच वर उडेल,
जेव्हा माझी पिल्लू माझ्यासोबत फिरकी घेऊन उभी राहील

“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण मला खूप येते यार.”

 मला फक्त तुला हसताना बघायचं आहे,
त्या मागचे कारण मी नसले तरी चालेल

 तुझी आठवण येणार नाही,
असे कधी होणार नाही,
काऱण तुझी आठवण आल्यावाचून राहणार नाही

आठवण येते तुझी रोज काय करु
पण तुझ्याशिवाय माझा दिवस जात नाही

Love Shayari in Marathi

Love Shayari in Marathi

Love Shayari in Marathi Image

कितीही भांडण झाली तरी,
तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
आणि अनमोल हाच धागा कितीही
ताणला तरी तुटत नाही. 

काय बोलायचं माहिती नसत
तरी पण मला तुझ्याशीच बोलायचं असत…

श्वास तु ध्यास तु इतिहास तु भविष्य तु,
गोड तु सुंदर तु मधाळ तु,
माझ्या हृदयाचा धडडणारा आवाज तु…

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

 तिने विचारले, मी तुझ्यासाठी काय आहे,
मी जवळ गेलो आणि तिला मिठीत घेतले,
आणि म्हणालो सर्वकाही

भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात
सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात,
तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

 तुझ्यासाठी जीव देणारे खूप असतील,
पण तुझ्यावर जीव लावणारा फक्त मीच आहे

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…

 एक भाषा जी नजरेची नजरेलाच कळते,
शब्दाविना भावनांची मग,
नकळत देवा- घेवाण होते

अबोल तू अस्वस्थ मी,
अक्षर तू शब्द मी,
समोर तू आनंदी मी,
सोबत तू संपूर्ण मी.

“प्रेमात भीती अन भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना ? साथ देत जगाव…”

 एकमेकांची चूक विसरुन
एकमेकांना समजून घेणे
हेच खरे प्रेम असते

जगातील सर्वात सुंदर मन तुझे आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

Romantic Shayari Marathi

Romantic Shayari Marathi

Romantic Shayari Marathi Image

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंय
ह्रदयाच्या पंखावरती तुझे नाव कोरुन ठेवलंय

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

जसे फुलातून सुगंध,
आणि सूर्यातून प्रकाश,
येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासात
तुझाच ध्यास

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.

जिथे कदर नाही,
तिथे थांबण्यात काही अर्थ नाही…

पाणी फक्त सूर्यप्रकाशात चमकते,
आणि तूच माझा सूर्यप्रकाश आहे

पाऊस पडला की, दोन गोष्टी कराव्याशा वाटतात,
एक चहा पिण्याची आणि दुसरी तुला भेटून मिठीत घेण्याची

जिवापाड प्रेम करणाऱ्यांना
प्रेम व्यक्तच करता येत नाही…

आठवणींच्या हिंदोळ्यात मला तुझ्या झुलायचे आहे,
तुझ्यासाठी मला शेवटपर्यंत सगळे काही करायचे आहे

प्रेम म्हणजे फक्त
योग्य व्यक्ती शोधणे नव्हे
तर योग्य नाते निर्माण करणे.

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग हा गुलाबी,
त्याला येते तुझ्या प्रेमाने लाली

“कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी,
हक्काची किंवा महत्त्वाची,
पण ती कधीही बदलणारी नसावी…

 गप्प राहावंस वाटतं,
तुझ्याजवळ बसल्यावर,
वाटतं तू ओळखावंस,
मी नुसतं हसल्यावर

Good morning love Shayari Marathi

Good morning love Shayari Marathi

Good morning Love Shayari Marathi Image

पहाटेचा वारा खूप काही सांगून गेला,
तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला
The morning wind said a lot,
He left a message that he missed you.

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो
फक्त आपल्याकडे माणूसकी असायला हवी
We can open the door to everyone's mind.
You just have to have humanity.

तुमची एक स्माईल पाहण्यासाठी मी उत्साहीत आहे,
उठा आता सकाळ झाली आहे
I'm excited to see one of your smiles,
Get up now it's morning

 सकाळच्या गारव्यात मला तुम्ही आठवले,
प्रेमाचे एक पान मी मनामध्ये साठवले
 I remember you in the morning chill,
I stored a page of love in my mind

कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे,
क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
Bloom like a bud and bloom like a flower,
Life swings on the waves of the moment

ताज्या पोस्ट